[10:03 am, 19/12/2021] Kaushal Desai: या वळणावर
बेल वाजली म्हणून मुकुंद गायतोंडे नी दरवाजा उघडला तर समोर कुरिअर देणारा,
बरं मुल घरी असताना काही ऑनलाईन मागवायचे पण आता ते आणि त्यांची पत्नी दोघेच घरी
आपल्याला आता कोणाचे कुरिअर आले? हा प्रश्न डोक्यात आला आणि
त्याच विचारा मध्ये सही करून पाकीट ताब्यात घेतलं
उघडून बघतात तर काय त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी च्या नावे येण्या जाण्याची कानपूर ची विमानाची तिकिटे
त्यांना काही संदर्भ लागेना तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आल्याची रिंग वाजली
मेसेज अनोळखी नंबर वरून होता
नमस्कार
मी पंढरीनाथ भंडारी
आपल्या सर्वांचे, मित्र मंडळी, नातेवाईक स्नेही यांचा एक परिवार मेळावा आयोजित केला आहे बरीच वर्ष झाली आपण एकमेकांना भेटून नक्की या वाट पाहत आहे
तो मेसेज वाचताच मुकुंदराव फ्लॅशबॅक मध्ये गेले
पंढरीनाथ आणि ते एकच डिपार्टमेंट ला रिटायरमेंट पर्यंत साधारण १५ वर्ष एकत्र होते अत्यंत मनमोकळा दिलखुलास माणूस
नेहमी हसतमुख दुसऱ्याला मदत करणारा
त्यांच्या वाट्याला एकच दुःख होत त्यांना मुल बाळ नव्हतं तरी देखील त्यांनी किंवा त्यांच्या पत्नी मनोरमा ताई नी कधी ते इतरांना जाणवू दिलं नव्हतं मुळातच घरच बर होत त्यात पगार चांगला होता सेवा निवृत्ती नंतर बऱ्यापैकी पैसा आला होता
घरी suv गाडी होती
आणि अचानक निवृत्ती नंतर महिन्या भरात
पंढरीनाथ आणि त्यांची पत्नी कुठे निघून गेले काही समजलंच नाही अगदी घरदार विकून गेले
फोन पण बंद केले होते
हे सगळंच त्यांच्या ओळखीच्या लोकांना अनपेक्षित होत ज्यांना त्यांनी घर विकलं होत त्यांना फक्त येवढाच मेसेज देलेला होता की कोणी विचारलं तर सांगा आम्ही सुखरुप आहोत काळजी नसावी
सुरवातीला काय झालं असावं या बद्दल बराच उहापोह झाला पण मग कालांतराने आपापल्या व्यापात सगळे विसरून ही गेले
आणि आज अचानक ही विमानाची तिकीट आणि मेसेज मुकुंदराव नी त्यांच्या पत्नीला सर्व काही सांगितले या दोघांनी जायचे नक्की केले
एका भव्य लॉनवर कार्यक्रम होता
बरेच लोक आले होते त्यातले मुकुंदरावांच्या संपर्कात असलेले ओळखीचे बरेच होते
पंढरीनाथ स्व:त सर्वांना भेटून त्यांची ख्याली खुशाली विचारत होते मात्र त्यांना काही विचारल्या नंतर थोड्या वेळात खुलासा होईल अस म्हणायचे
आणि मग स्टेज वरून पंढरीनाथ यांनी बोलायला सुरवात केली
नमस्कार
आज आपण सर्व जण माझ्या विनंतीला मान देऊन आलात त्या बद्दल मी आणि मनोरमा आपल्या सर्वांचे आभार आहोत
रिटायर व्हायच्या आधी काही दिवस अस मनात आल, नोकरी संपली की देशातल्या प्रत्येक प्रांतात जाऊन राहायचं तिथलं वातावरण, लोक, अनुभवायचे अस ठरवून सगळी मालमत्ता विकून आम्ही निघालो
अर्थात हा निर्णय मी मनोरमा वर लादला अस तुम्हाला वाटेल पण तस नाही आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला
पहिले गुजराथ मध्ये १ वर्ष राहिलो भाड्याचे घर,भाड्याचे फर्निचर सहित घेतलं होत घर मग
नंतर त्याच पद्धतीने मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली हरियाणा पंजाब अस करत करत सात भगिनी अर्थात नॉर्थ ईस्ट आणि इतर बाकीची राज्ये करत आता आम्ही यूपी मध्ये आहोत, नोकरीत असताना सुरवातीची बरीच वर्ष दक्षिण भारतात काढल्या मुळे तिकडे जाणार नव्हतो
या १५/१६ वर्षा मध्ये एक जाणवलं की प्रत्येक प्रांत वेगळा, भाषा वेगळी, खाण रहाण वेगळं असलं तरी माणूस तोच आहे भारतीय, उत्सव प्रिय, सुखद प्रसंग साजरे करणारे, दुसऱ्यांना मदत करणारे, नात निर्माण करणारे त्या मुळे
प्रत्येक प्रांतात चांगले सखे सोबती, मित्र, जोडले गेले ,
जीवनाचा खरा आनंद निवृत्ती नंतरच मिळाला,
दोघां पैकी कोणीतरी पुढील प्रवासाला आधी जाणार हे निश्चितच आहे त्या मुळे साथ सोडून गेल्या नंतर मागे थांबेल त्याने वृद्धाश्रमात राहायचं हे ठरलं आहे आणि वृध्दाश्रम देखील ठरला आहे जिथे अगदी वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध आहेत
आता आम्ही जिवंत असे पर्यंत प्रयाग राज मध्येच राहणार आहोत
वृध्दाश्रम तिथेच आहे
जीवनाचा प्रवास तिथेच संपेल
उगाच माझी संपत्ती, जागा, गाड्या ,अस करण्या पेक्षा सर्व काही विकून,
हो मी निघताना माझी suv पण विकून निघालो
आज सर्व काही भाड्याने मिळत, आम्ही गेल्या नंतर जर काही पैसे, हो आता पैसेच राहिले आहेत
कारण स्थावर जंगम मालमत्ता आम्ही ठेवलीच नाही ,
ते पैसे एका सामाजिक संस्थे ला जाणार आहेत
तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की हे मी तुम्हाला सांगून का नाही केलं ?
मी बोललो असतो तर तुम्ही मला जाऊ दिलं नसत आणि मी देखील तुमच्या सर्वांच्या प्रेमा मुळे निघू शकलो नसतो,
मी आणि मनोरमा अत्यंत आनंदी आहोत देवाने सर्व काही दिलं आता हात पाय धड असे पर्यंत विमानाचं तिकीट त्यानं पाठवाव हीच प्रार्थना
अस म्हणून पंढरीनाथ स्टेज वरून खाली उतरले
प्रशांत गोखले
१९/१२/२०२१
Comments
Post a Comment